Sunday 23 October 2011

आठ गावांमध्ये निर्जळी
बोधेगाव। दि. २२ (वार्ताहर)
थकबाकीच्या कारणावरुन 'महावितरण' ने वीज पुरवठा खंडित केल्याने शेवगाव तालुक्यातील बोधेगावसह आठ गावांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.
बोधेगाव, बालमटाकळी, शिंगोरी, राणेगाव, अंतरवाली, चापडगाव, ठाकूरपिंपळगाव, एकबुरजी या गावांना गदेवाडी फाट्यावरील जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होतो. दर महिन्याला या पाणी योजनेचे वीज बील पाणी वाटप संस्था भरते. परंतु मागील थकबाकीचे कारण देत 'महावितरण' ने या पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडित केला. 'महावितरण' सापत्नभावाची वागणूक देत असल्याचा आरोप पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष, बोधेगावचे सरपंच राम अंधारे यांनी केला.
दरम्यान, पाच दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित झाल्याने या गावांमधील महिला, शाळकरी मुलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ऐन दिवाळीत ' महावितरण' ने थकबाकीचे कारण देत वीज पुरवठा खंडित करुन ग्रामस्थांच्या उत्साहावर पाणी पेरले आहे. दिवाळीसाठी पाहुणे म्हणून आलेल्यांनावरही हंडा घेऊन आड, विहीर शोधण्याची वेळ आली आहे.

No comments:

Post a Comment