Saturday 21 January 2012

सबलीकरणावर कार्यशाळा बोधेगाव । दि.२१ (वार्ताहर) येथील आबासाहेब काकडे महाविद्यालयात महिला सबलीकरणावर कार्यशाळा घेण्यात आली. प्रौढ निरंतर शिक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजित या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एम.के. फसले होते. मुलगी दोन्ही घरचा दिवा असते. तिने स्वत:मधील स्त्रीत्वाचा साक्षात्कार ओळखून मानसिक प्रबळ होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेवगाव महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. छाया भालशंकर यांनी केले. सध्याच्या स्पर्धेच्या युगात मुलींनी स्वसंरक्षणासाठी निरनिराळय़ा धाडसी, पराक्रमी महिलांच्या कामगिरींचा अभ्यास करणे महत्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या. प्रा. निर्मला पवार यांनी मुलींच्या समस्या, प्रश्न, खुल्या चर्चेव्दारे समजावून घेतल्या. डॉ.पल्लवी गलांडे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील मुलींच्या माता पालक मनिषा शिंदे, व्दारका शिंदे, चैनाबाई छाजेड, छाया छाजेड, रेणुका शिंदे, महाविद्यालयीन कर्मचारी तसेच परिसरातील महिला, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने हजर होते. प्रा. गजानन लोंढे यांनी सूत्रसंचालन केले.सबलीकरणावर कार्यशाळा बोधेगाव । दि.२१ (वार्ताहर) येथील आबासाहेब काकडे महाविद्यालयात महिला सबलीकरणावर कार्यशाळा घेण्यात आली. प्रौढ निरंतर शिक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजित या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एम.के. फसले होते. मुलगी दोन्ही घरचा दिवा असते. तिने स्वत:मधील स्त्रीत्वाचा साक्षात्कार ओळखून मानसिक प्रबळ होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेवगाव महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. छाया भालशंकर यांनी केले. सध्याच्या स्पर्धेच्या युगात मुलींनी स्वसंरक्षणासाठी निरनिराळय़ा धाडसी, पराक्रमी महिलांच्या कामगिरींचा अभ्यास करणे महत्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या. प्रा. निर्मला पवार यांनी मुलींच्या समस्या, प्रश्न, खुल्या चर्चेव्दारे समजावून घेतल्या. डॉ.पल्लवी गलांडे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील मुलींच्या माता पालक मनिषा शिंदे, व्दारका शिंदे, चैनाबाई छाजेड, छाया छाजेड, रेणुका शिंदे, महाविद्यालयीन कर्मचारी तसेच परिसरातील महिला, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने हजर होते. प्रा. गजानन लोंढे यांनी सूत्रसंचालन केले.

सबलीकरणावर कार्यशाळा
बोधेगावदि.२१ [गणपत दसपुते] 
येथील आबासाहेब काकडे महाविद्यालयात महिला सबलीकरणावर कार्यशाळा घेण्यात आली. प्रौढ निरंतर शिक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजित या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एम.के. फसले होते.
मुलगी दोन्ही घरचा दिवा असते. तिने स्वत:मधील स्त्रीत्वाचा साक्षात्कार ओळखून मानसिक प्रबळ होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेवगाव महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. छाया भालशंकर यांनी केले.
सध्याच्या स्पर्धेच्या युगात मुलींनी स्वसंरक्षणासाठी निरनिराळय़ा धाडसी, पराक्रमी महिलांच्या कामगिरींचा अभ्यास करणे महत्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या. प्रा. निर्मला पवार यांनी मुलींच्या समस्या, प्रश्न, खुल्या चर्चेव्दारे समजावून घेतल्या. डॉ.पल्लवी गलांडे यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी महाविद्यालयातील मुलींच्या माता पालक मनिषा शिंदे, व्दारका शिंदे, चैनाबाई छाजेड, छाया छाजेड, रेणुका शिंदे, महाविद्यालयीन कर्मचारी तसेच परिसरातील महिला, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने हजर होते. प्रा. गजानन लोंढे यांनी सूत्रसंचालन केले.

Friday 20 January 2012

पस्तीस गावांवर विजेचे संकट
बोधेगाव दि.१९ (वार्ताहर)
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरातील पस्तीस गावांमध्ये वीज प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक रोहित्रे जळाल्याने ऐन हंगामात पिके पाण्यावाचून धोक्यात आली आहेत.
'महावितरण'च्या बालमटाकळी उपकेंद्रातील पस्तीस गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक रोहित्रे महिन्यापासून विजेच्या कमी-अधिक दाबामुळे निकामी झाली आहेत. त्यामुळे ऐन हंगामातील ज्वारी, ऊस, हरभरा, गहू ही पिके धोक्यात आली आहेत.
याबाबत या भागातील शेतकर्‍यांनी 'महावितरण'शी संपर्क केला असता रोहित्रावरील थकबाकी भरलेली बिले दाखवा, त्यानंतरच नवीन रोहित्राची शिफारस आपण वरिष्ठांकडे करु, असे उत्तर मिळते, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. थकबाकी भरण्यासाठी शेतकर्‍यांकडे सध्या उत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत्र नाही. भावाअभावी कापूस घरात पडून आहे. कापसाचे उत्पादनही यंदा निम्म्याने घटल्याने हातात पैसा नाही. त्यामुळे बिलासाठी पैसे कोठून आणायचे ? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.
सध्या पिकांना पाण्याची गरज आहे. पाण्याअभावी गहू, हरभरा तसेच नवीन ऊस लागवडही धोक्यात आली आहे. वीज नसल्याने शेतकर्‍यांना जनरेटरची मदत घ्यावी लागते. जनरेटरचा खर्च करुनही काही शेतकरी वैतागले आहेत. या भागातील रोहित्रांचा अहवाल 'महावितरण' ने तातडीने नगरला मुख्य कार्यालयाकडे पाठवावा, अशी मागणी होत आहे.

Sunday 15 January 2012

जेवणावळी, प्रचाराला सुरुवात
ुबोधेगाव | दि.१५ (वार्ताहर)
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी बोधेगाव गटात सुरू झाली आहे. खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी हा जिल्हा परिषद गट असल्याने पत्नीच्या उमेदवारीसाठी पतीराजांची धावपळ सुरू आहे. एकीकडे पक्षाकडून उमेदवारी मिळवायची, तर दुसरीकडे मतदारराजाची सर्व बडदास्त ठेवली जात आहे.
गोडधोड जेवणावळी, खारे मसालेदार मेवा त्यासोबत मदिरेचा घोट घेऊन उमेदवाराचा जयजयकार सुरू असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. दरम्यान महिला सक्षमीकरणाला येथे फाटा देऊन पुरुष (पतीराज)च सध्याच्या कडाक्याच्या थंडी-वार्‍याचा विचार न करता मतदारांच्या गावोगावी गाठीभेटी घेत आहेत. मतदारांशी संपर्क वाढवत आहेत.
निवडणूक कार्यक्रमात प्रचारासाठी फक्त सहा ते सात दिवस मिळणार आहेत. एवढय़ा दिवसांत गटातील २५ ते ३0 गावांचा संपर्क करणे शक्य नसल्याने तिकीट निश्‍चित होण्यापूर्वीच काही उमेदवारांनी प्रचार सुरु केला आहे.

Thursday 5 January 2012

बोधेगावच्या बसस्थानकाला अवकळा    [छाया -अन्वर मणियार ] 

बोधेगाव। दि.४ (गणपत दसपुते)

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे परिवहन महामंडळाच्या पंचसूत्री योजनेचा बोजवारा उडाला आहे. अनेक बसेसची तावदाने (काचा) गायब झाली आहेत. स्थानकालाही अवकळा आली आहे. या एकूण परिस्थितीमुळे बोधेगाव बस स्थानक 'असून अडचण, नसून खोळंबा' बनले आहे.
परिवहन महामंडळाची दि. १ ते १0 जानेवारी या कालावधीत 'विना अपघात सुरक्षितता' मोहीम चालू आहे. यामध्ये स्वच्छ स्थानक हा मुद्दा आहे. याला बोधेगाव येथे हरताळ फासण्यात आला आहे. हे इंग्रजकालीन स्थानक आहे. स्थानकातील गैरसोयींमुळे प्रवाशांना सध्या अनेक अडचणींशी ससामना करावा लागतो.परभणी, पुणे, बीड, जालना, नांदेड, मुंबई, हैद्राबाद, परळी, सोलापूर या लांब मार्गावरील बसेसची कायम वर्दळ असते. शेवगाव आगाराच्या मोडकळीस आलेल्या बसेस या मार्गावर पाठविल्या जातात. अशा तक्रारी आहेत.

Sunday 1 January 2012


'धरण उशाला कोरड घशाला'
बोधेगाव
- [गणपत दसपुते ] बोधेगाव परिसरातील पस्तीस गावे पाण्याअभावी दुष्काळाशी सामना करीत आहेत. 'धरण उशाला कोरड घशाला' अशी अवस्था बोधेगाव परिसराची झाली आहे. बोधेगाव परिसरातील हजारो हेक्टर जमीन पाण्यावाचून नापीक बनली आहे. दोन पिढय़ांचा संघर्ष जायकवाडीचे पाणी पूर्व भागातील लाडजळगावपर्यंत आणण्यासाठी अयशस्वी ठरला आणि आता तिसरी पिढीही संघर्षाच्या पावित्र्यात आहे. शेवगाव तालुक्यातील दहिगाव,खानापूर परिसरातील हजारो हेक्टर जमीन जायकवाडीच्या धरणाखाली जाऊन हजारो कुटुंब विस्थापित झाली. परंतु त्याचा फायदा शेवगाव तालुक्याऐवजी नांदेड, परभणी, बीड येथील नागरिकांना अधिक झाला. बोधेगाव भागातील साठ गावे जायकवाडी उजव्या कालव्याने जोडून तालुक्यातील लाडजळगावपर्यंत पाणी मिळावे यासाठी स्व. मारुतराव घुले, बाळासाहेब भारदे, आबासाहेब काकडे यांनी संघर्ष केला. त्यानंतर दुसर्‍या पिढीतही माजी आ. नरेंद्र घुले यांनी संघर्ष सुरु ठेवला. आमदार चंद्रशेखर घुले यांनीही मंत्रालयस्तरावर याबाबत पाठपुरावा सुरु केल्याचे समजते.