Sunday 1 January 2012


'धरण उशाला कोरड घशाला'
बोधेगाव
- [गणपत दसपुते ] बोधेगाव परिसरातील पस्तीस गावे पाण्याअभावी दुष्काळाशी सामना करीत आहेत. 'धरण उशाला कोरड घशाला' अशी अवस्था बोधेगाव परिसराची झाली आहे. बोधेगाव परिसरातील हजारो हेक्टर जमीन पाण्यावाचून नापीक बनली आहे. दोन पिढय़ांचा संघर्ष जायकवाडीचे पाणी पूर्व भागातील लाडजळगावपर्यंत आणण्यासाठी अयशस्वी ठरला आणि आता तिसरी पिढीही संघर्षाच्या पावित्र्यात आहे. शेवगाव तालुक्यातील दहिगाव,खानापूर परिसरातील हजारो हेक्टर जमीन जायकवाडीच्या धरणाखाली जाऊन हजारो कुटुंब विस्थापित झाली. परंतु त्याचा फायदा शेवगाव तालुक्याऐवजी नांदेड, परभणी, बीड येथील नागरिकांना अधिक झाला. बोधेगाव भागातील साठ गावे जायकवाडी उजव्या कालव्याने जोडून तालुक्यातील लाडजळगावपर्यंत पाणी मिळावे यासाठी स्व. मारुतराव घुले, बाळासाहेब भारदे, आबासाहेब काकडे यांनी संघर्ष केला. त्यानंतर दुसर्‍या पिढीतही माजी आ. नरेंद्र घुले यांनी संघर्ष सुरु ठेवला. आमदार चंद्रशेखर घुले यांनीही मंत्रालयस्तरावर याबाबत पाठपुरावा सुरु केल्याचे समजते.

No comments:

Post a Comment