Friday, 10 June 2011

Bodhegaon yethe kapashi biyanachya rikamya dabyala ala sonyacha bhav

 
                                 (छाया-अन्वर मनियार बोधेगाव   )  
 
 गणपत दसपुते (बोधेगाव )                                                                                                             
राज्यात कपाशी बियाणाचे कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने ७३५१ (कनक )या वानाच्या बियाणासाठी वाटेल ते करण्याचा मार्ग अनेकांनी अवलंबिला असून त्याचे लोन बोधेगावात आले आहे .त्याचाच भाग म्हणून मराठ वाड्यातील बियाणे तस्करांची एक टोळी गावात दाखल झाली असून या मध्ये तरुणांचा भरणा जास्त आहे .७३५१ या बियाणाच्या रिकाम्या डब्यासाठी ४०० ते ५०० रु पये  देण्याची तयारी सदर टोळीतील तरुण दाखवत आहे .त्या साठी गावातील काहीं हस्ताकामार्फात गिर्हाईक शोधण्याचा धंदा खुले आम सुरु आहे .या साठी हस्तकला ठराविक रक्कम मिळत असल्याने हस्तक हि तोंडचे भांडवल करून मालामाल होण्याच्या मार्गावर आहे .तर शेतकर्यांना रिकाम्या ब्याला सोन्याचा भाव मिळत असल्याने सर्व काही मिली भगत स्वरुपात सुरु आहे . ganpatdaspute@gmail.com

No comments:

Post a Comment