Friday, 30 December 2011
Thursday, 15 December 2011
Wednesday, 7 December 2011
Tuesday, 6 December 2011
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा आदर्श घ्यावा - मांदळे
बोधेगाव दि .६[वार्ताहर ] भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून बोधेगाव जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक महादेव मांदळे यांनी अभिवादन करत डॉ. बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा धडा विद्यार्थ्यांनी घेऊन आपली वाटचाल करण्याचा सल्ला दिला. महानिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी ‘बाल आंबेडकर’ विषयावर ग. वि. दसपुते यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते करीम बापू सय्यद हे होते. याप्रसंगी मुलांची भाषणे झाली. कार्यक्रमाला भागवत घुले, सुखदेव शिंदे, शैला कुबडे, चंद्रशेखर पाटील, अंबादास गर्कळ यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. [छाया -अन्वर मणियार ]

Monday, 5 December 2011
भूमिहिनांना आमआदमीचा आधार |
बोधेगाव। दि. ५ (गणपत दसपुते) |
आमआदमी विमा योजनेंतर्गत येथील १६ भूमिहीन व १८ अल्पभूधारक लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाचा समारंभ येथील मंडलाधिकारी कार्यालयात आज झाला. येथील भूमिहीन मजुरांनी सन २0१0-११ मध्ये या योजनेसाठी तलाठी कार्यालयामार्फत अर्ज केले होते. त्यानुसार १६ भूमिहीन व १८ अल्पभूधारक शेतकर्यांना विमाप्रमाणपत्र मिळाली आहेत. मंडल अधिकारी कार्यालय तलाठी अप्पासाहेब शिंदे, दत्तात्रय घोरतळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. दरम्यान, या विमा प्रमाणपत्राद्वारे भविष्यात या लाभार्थींचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास तीस हजार, अपंगत्व आल्यास ३७ हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. या लाभार्थींचा पाल्य जर ९ वी ते १२ मध्ये शिक्षण घेणारा असल्यास त्याला शंभर रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती मिळणार आहे[छाया -अन्वर मणियार ]. |
Subscribe to:
Posts (Atom)