Monday, 5 December 2011

भूमिहिनांना आमआदमीचा आधार
बोधेगाव। दि. ५ (गणपत दसपुते)
आमआदमी विमा योजनेंतर्गत येथील १६ भूमिहीन व १८ अल्पभूधारक लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाचा समारंभ येथील मंडलाधिकारी कार्यालयात आज झाला.
येथील भूमिहीन मजुरांनी सन २0१0-११ मध्ये या योजनेसाठी तलाठी कार्यालयामार्फत अर्ज केले होते. त्यानुसार १६ भूमिहीन व १८ अल्पभूधारक शेतकर्‍यांना विमाप्रमाणपत्र मिळाली आहेत. मंडल अधिकारी कार्यालय तलाठी अप्पासाहेब शिंदे, दत्तात्रय घोरतळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. दरम्यान, या विमा प्रमाणपत्राद्वारे भविष्यात या लाभार्थींचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास तीस हजार, अपंगत्व आल्यास ३७ हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. या लाभार्थींचा पाल्य जर ९ वी ते १२ मध्ये शिक्षण घेणारा असल्यास त्याला शंभर रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती मिळणार आहे
[छाया -अन्वर मणियार ].

No comments:

Post a Comment