डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा आदर्श घ्यावा - मांदळे
बोधेगाव दि .६[वार्ताहर ] भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून बोधेगाव जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक महादेव मांदळे यांनी अभिवादन करत डॉ. बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा धडा विद्यार्थ्यांनी घेऊन आपली वाटचाल करण्याचा सल्ला दिला. महानिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी ‘बाल आंबेडकर’ विषयावर ग. वि. दसपुते यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते करीम बापू सय्यद हे होते. याप्रसंगी मुलांची भाषणे झाली. कार्यक्रमाला भागवत घुले, सुखदेव शिंदे, शैला कुबडे, चंद्रशेखर पाटील, अंबादास गर्कळ यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. [छाया -अन्वर मणियार ]

No comments:
Post a Comment