जेवणावळी, प्रचाराला सुरुवात |
ुबोधेगाव | दि.१५ (वार्ताहर) जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी बोधेगाव गटात सुरू झाली आहे. खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी हा जिल्हा परिषद गट असल्याने पत्नीच्या उमेदवारीसाठी पतीराजांची धावपळ सुरू आहे. एकीकडे पक्षाकडून उमेदवारी मिळवायची, तर दुसरीकडे मतदारराजाची सर्व बडदास्त ठेवली जात आहे. गोडधोड जेवणावळी, खारे मसालेदार मेवा त्यासोबत मदिरेचा घोट घेऊन उमेदवाराचा जयजयकार सुरू असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. दरम्यान महिला सक्षमीकरणाला येथे फाटा देऊन पुरुष (पतीराज)च सध्याच्या कडाक्याच्या थंडी-वार्याचा विचार न करता मतदारांच्या गावोगावी गाठीभेटी घेत आहेत. मतदारांशी संपर्क वाढवत आहेत. निवडणूक कार्यक्रमात प्रचारासाठी फक्त सहा ते सात दिवस मिळणार आहेत. एवढय़ा दिवसांत गटातील २५ ते ३0 गावांचा संपर्क करणे शक्य नसल्याने तिकीट निश्चित होण्यापूर्वीच काही उमेदवारांनी प्रचार सुरु केला आहे. |
Sunday, 15 January 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment