Monday, 31 October 2011

बोधेगाव पाणी योजनेसाठी
उद्या आठ गावांचा रास्तारोको
बोधेगाव। दि. ३१ (गणपत दसपुते)
थकबाकीचे कारण देत महावितरण कंपनीने बोधेगावसह आठ गावांच्या पाणी पुरवठय़ाचा वीज पुरवठा खंडित केल्याने या पाणी वाटप संस्थेने महावितरणच्या विरोधात बुधवार (दि. २) रोजी शेवगाव-गेवराई राजमार्गावर रास्ता रोकोचा इशारा आज झालेल्या सरपंचांच्या बैठकीत दिला आहे.
गेल्या शनिवारी (दि. २९) रोजी महावितरण कंपनीने थकबाकीचे कारण पुढे करत बोधेगावसह आठ गावांच्या पाणी योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्याने आज दि. ३१ रोजी या पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष रामजी अंधारे यांनी तातडीची आठ गावांच्या सरपंचाची बैठक घेतली.
त्यामध्ये रास्ता रोकोचा निर्णय घेण्यात आला व वरिष्ठांना निवेदन पाठवले असून, त्यामध्ये या योजनेचा वीज पुरवठा सुरळीत करून १५ दिवसांची मुदत, चालू बाकी भरण्यासाठी द्यावी व या योजनेचे जिल्हा परिषदेकडील थकलेले ९ लाख अनुदान प्राप्त झाल्यावर उर्वरित थकबाकी भरण्याची सवलत मिळावी असे म्हटले आहे.
दरम्यान, ही योजना सुरू झाल्याने बोधेगाव, बालमटाकळी, राणेगाव, शिंगोरी, दहिगाव-शे, अंतरवाली खुर्द, ठाकूर पिंपळगाव, चापडगाव या गावांचे टँकर बंद झाले. परंतु या योजनेला अडसर आल्यास शासनाने पुन्हा टँकर सुरू करण्याची मागणीही सरपंचाच्या बैठकीत करण्यात आली. सदर निवेदनाच्या प्रती जिल्हास्तरीय संबंधित अधिकार्‍यांना पाठविण्यात आल्या आहेत.
या पाणी योजनेच्या तोडगा बैठकीला बोधेगावचे सरपंच तथा अध्यक्ष राम अंधारे, उपसरपंच भाऊराव भोंगळे, ठाकूर पिंपळगावचे सरपंच बापू बडे, बालमटाकळीचे सरपंच, तुषार वैद्य, अंतरवालीचे सरपंच एकनाथ कसाळ, शिंगोरीचे उपसरपंच प्रभाकर चेमटे, राणेगावचे सदस्य बाळासाहेब खेडकर, चापडगावचे सरपंच शिवाजी नेमाने उपस्थित होते                                                                            .[ छाया -अन्वर मणियार ]

Sunday, 30 October 2011

बोधेगावसह आठ गावांमध्ये निर्जळी

थकबाकीवरुन 'महावितरण' कडून पाणी योजनेची वीज पुन्हा खंडित, तोडग्यासाठी आज बैठक

'महावितरण' कडून
...
सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याचा बोधेगावचे सरपंच राम अंधारे यांचा आरोप
बोधेगाव । दि. ३0 (गणपत दसपुते)

थकबाकीचे कारण देत 'महावितरण' ने पुन्हा शेवगाव तालुक्यातील बोधेगावसह आठ गावांचा वीजपुरवठा शनिवारी (दि. २९) खंडित केला. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ पुन्हा महिलांवर आली आहे.
गेल्या आठ दिवसापूर्वी ऐन दिवाळीच्या तोंडावर 'महावितरण' ने वीज पुरवठा खंडित करुन पाणी योजनेला वेठीस धरले होते. परंतु पाणी वाटप संस्थेने एक लाखाची बाकी भरली होती. त्यानंतर पाणी योजनेचा वीज पुरवठा पुर्ववत सुरु झाला.
दरम्यान, महिना, पंधरा दिवसानंतर 'महावितरण' या पाणी योजनेला मागील थकबाकीचे कारण पुढे करीत वीज पुरवठा खंडित करते, असा आरोप पाणीवाटप संस्थेचे अध्यक्ष राम अंधारे यांनी केला आहे. याबाबत आमदार चंद्रशेखर घुले यांनी 'महावितरण' ला सबुरीने घेण्याचा सल्लाही दिवाळीत दिला होता.
आठ गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या या योजनेचे बोधेगावचे सरपंच सदस्य आहेत. पाणी योजना ताब्यात घेतांना संबंधित ठेकेदाराने निकृष्ट प्रतीचे पाईप, फिटींगचे साहित्य वापरल्याने योजनेवर आतापर्यंत झालेला खर्च मोठा असल्याचे सरपंच अंधारे यांनी सांगितले.
कपाशीसह इतर पिकांचेही अतवृष्टीने नुकसान झाल्याने या भागातील शेतकर्‍यांकडे सध्या पाणीपट्टी व घरपट्टी भरण्यासाठी पैसा नाही. वसूलही होत नसल्याने ही योजना कशी चालवायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरपंच तथा पाणी योजनेचे अध्यक्ष राम अंधारे यांनी आठ गावातील सरपंचांची तातडीची बैठक सोमवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी बोलाविली आहे. बैठकीत 'महावितरण' च्या विरोधात करण्यात येणार्‍या आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे अंधारे यांनी सांगितले.
बोधेगाव, बालमटाकळी, शिंगोरी, राणेगाव, अंतरवाली, चापडगाव, ठाकूरपिंपळगाव, एकबुरजी या गावांना गदेवाडी फाट्यावरील जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होतो. दर महिन्याला या पाणी योजनेचे वीज बील पाणी वाटप संस्था भरते. परंतु मागील थकबाकीचे कारण देत 'महावितरण' ने या पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडित केला.
दिवाळीनंतर 'महावितरण' ने पुन्हा या पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडित केला आहे. दरम्यान, पाणी पुरवठा खंडित झाल्याने या गावांमधील महिला, शाळकरी मुलांना पाण्यासाठी भटकंती पुन्हा सुरु झाली आहे. 'महावितरण' कडून
सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याचा बोधेगावचे सरपंच राम अंधारे यांचा आरोप
See मोरे
छाया -[अन्वर मणियार बोधेगाव]

Friday, 28 October 2011

बालकांच्या जीवनात उगवली पहाट !
                                                                                                                                                                     बोधेगाव येथे कुपोषित बालकांना पौष्टिक आहाराचे वाटप  करताना सरपंच राम अंधारे  उपसरपंच भाऊराव भोंगळे [छाया -अन्वर मणियार]  

Thursday, 27 October 2011

  कपाशीमुळे भंगले  शेतकऱ्यांचे स्वप्न
दिवाळीत सौभाग्याच लेणं बँक पतसंस्थाकडे तारण 
दागिन्याविना दिवाळी .........
........................बोधेगाव परिसरात कपाशी  पिकावर लाल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव  झाला आहे ..[छाया -अन्वर मणियार ]  
ऐन दिवालीत पोटाची भूक भागवन्यासाठी आपल्या चिल्यापिल्यासह ;मुक्या प्राण्याच्या जीवावर बोधेगांव बाजरातालावर कसरतिचे खेळ करताना डोबारी                                                               [छाया -अनवर मनियार ]

Wednesday, 26 October 2011

बोधेगाव परिसरात कपाशीवर लाल्याचे  आक्रमण  शेतकरी हैराण                                                                     (छाया -अन्वर मणियार बोधेगाव )

Tuesday, 25 October 2011

बोधेगाव न्यूजच्या  सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ......
शुभेच्छुक - गणपत दसपुते  ,   अन्वर मणियार  ,    मुस्ताक शेख    बोधेगाव .