बोधेगावसह आठ गावांमध्ये निर्जळी
थकबाकीवरुन 'महावितरण' कडून पाणी योजनेची वीज पुन्हा खंडित, तोडग्यासाठी आज बैठक
'महावितरण' कडून
...
सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याचा बोधेगावचे सरपंच राम अंधारे यांचा आरोप बोधेगाव । दि. ३0 (गणपत दसपुते)
थकबाकीचे कारण देत 'महावितरण' ने पुन्हा शेवगाव तालुक्यातील बोधेगावसह आठ गावांचा वीजपुरवठा शनिवारी (दि. २९) खंडित केला. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ पुन्हा महिलांवर आली आहे.
गेल्या आठ दिवसापूर्वी ऐन दिवाळीच्या तोंडावर 'महावितरण' ने वीज पुरवठा खंडित करुन पाणी योजनेला वेठीस धरले होते. परंतु पाणी वाटप संस्थेने एक लाखाची बाकी भरली होती. त्यानंतर पाणी योजनेचा वीज पुरवठा पुर्ववत सुरु झाला.
दरम्यान, महिना, पंधरा दिवसानंतर 'महावितरण' या पाणी योजनेला मागील थकबाकीचे कारण पुढे करीत वीज पुरवठा खंडित करते, असा आरोप पाणीवाटप संस्थेचे अध्यक्ष राम अंधारे यांनी केला आहे. याबाबत आमदार चंद्रशेखर घुले यांनी 'महावितरण' ला सबुरीने घेण्याचा सल्लाही दिवाळीत दिला होता.
आठ गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या या योजनेचे बोधेगावचे सरपंच सदस्य आहेत. पाणी योजना ताब्यात घेतांना संबंधित ठेकेदाराने निकृष्ट प्रतीचे पाईप, फिटींगचे साहित्य वापरल्याने योजनेवर आतापर्यंत झालेला खर्च मोठा असल्याचे सरपंच अंधारे यांनी सांगितले.
कपाशीसह इतर पिकांचेही अतवृष्टीने नुकसान झाल्याने या भागातील शेतकर्यांकडे सध्या पाणीपट्टी व घरपट्टी भरण्यासाठी पैसा नाही. वसूलही होत नसल्याने ही योजना कशी चालवायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरपंच तथा पाणी योजनेचे अध्यक्ष राम अंधारे यांनी आठ गावातील सरपंचांची तातडीची बैठक सोमवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी बोलाविली आहे. बैठकीत 'महावितरण' च्या विरोधात करण्यात येणार्या आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे अंधारे यांनी सांगितले.
बोधेगाव, बालमटाकळी, शिंगोरी, राणेगाव, अंतरवाली, चापडगाव, ठाकूरपिंपळगाव, एकबुरजी या गावांना गदेवाडी फाट्यावरील जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होतो. दर महिन्याला या पाणी योजनेचे वीज बील पाणी वाटप संस्था भरते. परंतु मागील थकबाकीचे कारण देत 'महावितरण' ने या पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडित केला.
दिवाळीनंतर 'महावितरण' ने पुन्हा या पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडित केला आहे. दरम्यान, पाणी पुरवठा खंडित झाल्याने या गावांमधील महिला, शाळकरी मुलांना पाण्यासाठी भटकंती पुन्हा सुरु झाली आहे. 'महावितरण' कडून
सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याचा बोधेगावचे सरपंच राम अंधारे यांचा आरोपSee मोरेछाया -[अन्वर मणियार बोधेगाव]

सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याचा बोधेगावचे सरपंच राम अंधारे यांचा आरोपSee मोरे
No comments:
Post a Comment