Friday, 14 October 2011

बन्नो माँ यात्रेत रंगली रंगबाजी 
बोधेगाव। दि. १४ (गणपत दसपुते )                    
                                                                             
                                                                                   [  छाया -अन्वर मणियार ]
 
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील बन्नो माँ यात्रेत भाविकांच्या गर्दीचा उच्चांक झाला. दुसर्‍या दिवशी तीन तमाशा फडाची रंगबाजी तसेच वगनाट्याच्या जुगलबंदीने यात्रेत रंगत आली.
चार दिवस चालणार्‍या यात्रौत्सवाच्या आज तिसर्‍या दिवशी बन्नो माँ दग्र्यात गर्दीचा महापूर लोटला होता. त्यामुळे शेवगाव-गेवराई राजमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यात्रेत नवसाची चादर वाहण्याची परंपरा असल्याने गावकरी पाहुण्यांसह बन्नो माँ चरणी चादर अर्पण करण्यासाठी सक्रिय झाले होते. यात्रेत लहान मुले हरवण्याचे प्रमाण मोठे होते. यात्रा समितीने ध्वनीवर्धकाव्दारे गर्दीत वाट चुकलेल्या मुलांच्या वर्णनाची माहिती देण्याचे काम अहोरात्र केले. गर्दीचा फायदा घेऊन अनेक खिसेकापुंनी आपले इप्सित साध्य केले.
आमदार चंद्रशेखर घुले यांनी बन्नो माँचे दर्शन घेऊन चादर अर्पण केली. आ. घुले यांच्या प्रयत्नामुळे देवस्थानचा 'क' वर्गात समावेश झाल्याने सभा मंडपाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.  

No comments:

Post a Comment