Sunday, 9 October 2011

हिंदु -मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या बन्नोमा यात्रेस प्रारंभ

 बोधेगाव.[गणपत दसपुते] शेवगाव तालुक्याच्या  पूर्वभागातील ३५ गावामधील  हिंदुमुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या श्रीसाध्वी  बंनोमा यात्रेस बुधवार दि १२ पासून प्रारंभ होतआहे .त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची  माहिती यात्रा कमेटीच्यावतीने  देण्यात आली    
बुधवारी संदल निघणार असून रात्री गोदावरीच्या पाण्याने बंनोमाच्या समाधीस जलस्नान घालून यात्रेस प्रारंभ होणार आहे . गुरुवारी  छबिना निघणार असून यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे याच दिवशी राज्यातील नामांकित ५ ते ६ तमाशा फडाच्या  जुगलबंदी चा  कार्यक्रम हि पाहायला मिळणार आहे .
                    दरम्यान यात्रेच्या मुख्य दिवशी शुक्रवारी कुस्त्यांचा जंगी हंगामा होणार आहे .या हगाम्यात राज्यातील हिंदकेसरी महाराष्ट्रकेसरीसह  नामांकित मल्ल हजेरी लावत असतात तसेच शनिवारी बन्नोमा चरणी विविध कलाकाराच्या हजेर्याचा कार्यक्रम होणार आहे .
                                                   या वर्षी पाऊस चांगला झाल्याने यात्रेला किमान ५ ते ६ लाख उपस्थित राहतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे .यात्रा काळात अवैध धंद्यांना पूर्णपने  बंदी घालण्यात आली आहे .भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ४० ते ५० पोलिसांचा फौज फाटा तैनात करणार असल्याची माहिती शेवगावंचे पोलिसनिरीक्षक माने यांनी दिली .दरम्यान जिल्हा पोलीस अधिक्षक कृष्णप्रकाश भेट देणार असल्याचे समजते .
 [ छाया -अन्वर मणियार बोधेगाव]

No comments:

Post a Comment