बोधेगाव अवैध धंद्याच्या विळख्यात |
गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ |
बोधेगाव। दि. २७ [गणपत दसपुते] |
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसर सध्या अवैध धंद्याचा अड्डा बनला आहे. त्यामुळे गुन्हेगारीच्या प्रमाणातही वाढ होत आहे. अधोडी व बालमटाकळी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी टाकलेल्या छाप्यात टेम्पोभर देशी, विदेशी दारुचा अवैध साठा जप्त करण्यात आला. हा गोरख धंदा गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादाने चालू होता. बालमटाकळी येथे आढळलेल्या रिकाम्या बाटल्या, लेबल, झाकणे यावरुन बनावट दारु तयार करण्याचा व्यवसाय सुरु होता, असे प्रथमदर्शनी दिसते. या परिसरात पूर्वी पोत्यांनी गांजा सापडला होता. गेल्या महिन्यात जुगार अड्डय़ावर छापा टाकून मटकाकिंगला पकडण्यात आले होते. हे सर्व अवैध धंदे मराठवाड्याची सरहद्द बोधेगावपासून दहा कि. मी. अंतरावर असल्याने ते फोफावले आहेत. या भागातील माल मराठवाड्यात तर मराठवाड्यातील दारु, गांजा गावात विकण्याचे नेटवर्क वाढत आहेत. ुकमी पोलिस बळाचा फायदा हे तस्कर घेत असून त्यांचे मोबाईलचे नेटवर्क कारणीभूत आहे. या अवैध धंद्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ |
Sunday, 27 November 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment