बोधेगाव पाणी योजनेसाठी उद्या आठ गावांचा रास्तारोको | ||
बोधेगाव। दि. ३१ (गणपत दसपुते) | ||
थकबाकीचे कारण देत महावितरण कंपनीने बोधेगावसह आठ गावांच्या पाणी पुरवठय़ाचा वीज पुरवठा खंडित केल्याने या पाणी वाटप संस्थेने महावितरणच्या विरोधात बुधवार (दि. २) रोजी शेवगाव-गेवराई राजमार्गावर रास्ता रोकोचा इशारा आज झालेल्या सरपंचांच्या बैठकीत दिला आहे. गेल्या शनिवारी (दि. २९) रोजी महावितरण कंपनीने थकबाकीचे कारण पुढे करत बोधेगावसह आठ गावांच्या पाणी योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्याने आज दि. ३१ रोजी या पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष रामजी अंधारे यांनी तातडीची आठ गावांच्या सरपंचाची बैठक घेतली. त्यामध्ये रास्ता रोकोचा निर्णय घेण्यात आला व वरिष्ठांना निवेदन पाठवले असून, त्यामध्ये या योजनेचा वीज पुरवठा सुरळीत करून १५ दिवसांची मुदत, चालू बाकी भरण्यासाठी द्यावी व या योजनेचे जिल्हा परिषदेकडील थकलेले ९ लाख अनुदान प्राप्त झाल्यावर उर्वरित थकबाकी भरण्याची सवलत मिळावी असे म्हटले आहे. दरम्यान, ही योजना सुरू झाल्याने बोधेगाव, बालमटाकळी, राणेगाव, शिंगोरी, दहिगाव-शे, अंतरवाली खुर्द, ठाकूर पिंपळगाव, चापडगाव या गावांचे टँकर बंद झाले. परंतु या योजनेला अडसर आल्यास शासनाने पुन्हा टँकर सुरू करण्याची मागणीही सरपंचाच्या बैठकीत करण्यात आली. सदर निवेदनाच्या प्रती जिल्हास्तरीय संबंधित अधिकार्यांना पाठविण्यात आल्या आहेत. या पाणी योजनेच्या तोडगा बैठकीला बोधेगावचे सरपंच तथा अध्यक्ष राम अंधारे, उपसरपंच भाऊराव भोंगळे, ठाकूर पिंपळगावचे सरपंच बापू बडे, बालमटाकळीचे सरपंच, तुषार वैद्य, अंतरवालीचे सरपंच एकनाथ कसाळ, शिंगोरीचे उपसरपंच प्रभाकर चेमटे, राणेगावचे सदस्य बाळासाहेब खेडकर, चापडगावचे सरपंच शिवाजी नेमाने उपस्थित होते .[ छाया -अन्वर मणियार ] |
Monday, 31 October 2011
Sunday, 30 October 2011
बोधेगावसह आठ गावांमध्ये निर्जळी
थकबाकीवरुन 'महावितरण' कडून पाणी योजनेची वीज पुन्हा खंडित, तोडग्यासाठी आज बैठक
'महावितरण' कडून
...
सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याचा बोधेगावचे सरपंच राम अंधारे यांचा आरोप बोधेगाव । दि. ३0 (गणपत दसपुते)
थकबाकीचे कारण देत 'महावितरण' ने पुन्हा शेवगाव तालुक्यातील बोधेगावसह आठ गावांचा वीजपुरवठा शनिवारी (दि. २९) खंडित केला. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ पुन्हा महिलांवर आली आहे.
गेल्या आठ दिवसापूर्वी ऐन दिवाळीच्या तोंडावर 'महावितरण' ने वीज पुरवठा खंडित करुन पाणी योजनेला वेठीस धरले होते. परंतु पाणी वाटप संस्थेने एक लाखाची बाकी भरली होती. त्यानंतर पाणी योजनेचा वीज पुरवठा पुर्ववत सुरु झाला.
दरम्यान, महिना, पंधरा दिवसानंतर 'महावितरण' या पाणी योजनेला मागील थकबाकीचे कारण पुढे करीत वीज पुरवठा खंडित करते, असा आरोप पाणीवाटप संस्थेचे अध्यक्ष राम अंधारे यांनी केला आहे. याबाबत आमदार चंद्रशेखर घुले यांनी 'महावितरण' ला सबुरीने घेण्याचा सल्लाही दिवाळीत दिला होता.
आठ गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या या योजनेचे बोधेगावचे सरपंच सदस्य आहेत. पाणी योजना ताब्यात घेतांना संबंधित ठेकेदाराने निकृष्ट प्रतीचे पाईप, फिटींगचे साहित्य वापरल्याने योजनेवर आतापर्यंत झालेला खर्च मोठा असल्याचे सरपंच अंधारे यांनी सांगितले.
कपाशीसह इतर पिकांचेही अतवृष्टीने नुकसान झाल्याने या भागातील शेतकर्यांकडे सध्या पाणीपट्टी व घरपट्टी भरण्यासाठी पैसा नाही. वसूलही होत नसल्याने ही योजना कशी चालवायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरपंच तथा पाणी योजनेचे अध्यक्ष राम अंधारे यांनी आठ गावातील सरपंचांची तातडीची बैठक सोमवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी बोलाविली आहे. बैठकीत 'महावितरण' च्या विरोधात करण्यात येणार्या आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे अंधारे यांनी सांगितले.
बोधेगाव, बालमटाकळी, शिंगोरी, राणेगाव, अंतरवाली, चापडगाव, ठाकूरपिंपळगाव, एकबुरजी या गावांना गदेवाडी फाट्यावरील जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होतो. दर महिन्याला या पाणी योजनेचे वीज बील पाणी वाटप संस्था भरते. परंतु मागील थकबाकीचे कारण देत 'महावितरण' ने या पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडित केला.
दिवाळीनंतर 'महावितरण' ने पुन्हा या पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडित केला आहे. दरम्यान, पाणी पुरवठा खंडित झाल्याने या गावांमधील महिला, शाळकरी मुलांना पाण्यासाठी भटकंती पुन्हा सुरु झाली आहे. 'महावितरण' कडून
सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याचा बोधेगावचे सरपंच राम अंधारे यांचा आरोपSee मोरेछाया -[अन्वर मणियार बोधेगाव]

सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याचा बोधेगावचे सरपंच राम अंधारे यांचा आरोपSee मोरे
Sunday, 23 October 2011
आठ गावांमध्ये निर्जळी | ||
बोधेगाव। दि. २२ (वार्ताहर) | ||
थकबाकीच्या कारणावरुन 'महावितरण' ने वीज पुरवठा खंडित केल्याने शेवगाव तालुक्यातील बोधेगावसह आठ गावांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. बोधेगाव, बालमटाकळी, शिंगोरी, राणेगाव, अंतरवाली, चापडगाव, ठाकूरपिंपळगाव, एकबुरजी या गावांना गदेवाडी फाट्यावरील जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होतो. दर महिन्याला या पाणी योजनेचे वीज बील पाणी वाटप संस्था भरते. परंतु मागील थकबाकीचे कारण देत 'महावितरण' ने या पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडित केला. 'महावितरण' सापत्नभावाची वागणूक देत असल्याचा आरोप पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष, बोधेगावचे सरपंच राम अंधारे यांनी केला. दरम्यान, पाच दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित झाल्याने या गावांमधील महिला, शाळकरी मुलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ऐन दिवाळीत ' महावितरण' ने थकबाकीचे कारण देत वीज पुरवठा खंडित करुन ग्रामस्थांच्या उत्साहावर पाणी पेरले आहे. दिवाळीसाठी पाहुणे म्हणून आलेल्यांनावरही हंडा घेऊन आड, विहीर शोधण्याची वेळ आली आहे. |
Friday, 14 October 2011
बन्नो माँ यात्रेत रंगली रंगबाजी | ||
बोधेगाव। दि. १४ (गणपत दसपुते ) [ छाया -अन्वर मणियार ] | ||
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील बन्नो माँ यात्रेत भाविकांच्या गर्दीचा उच्चांक झाला. दुसर्या दिवशी तीन तमाशा फडाची रंगबाजी तसेच वगनाट्याच्या जुगलबंदीने यात्रेत रंगत आली. चार दिवस चालणार्या यात्रौत्सवाच्या आज तिसर्या दिवशी बन्नो माँ दग्र्यात गर्दीचा महापूर लोटला होता. त्यामुळे शेवगाव-गेवराई राजमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यात्रेत नवसाची चादर वाहण्याची परंपरा असल्याने गावकरी पाहुण्यांसह बन्नो माँ चरणी चादर अर्पण करण्यासाठी सक्रिय झाले होते. यात्रेत लहान मुले हरवण्याचे प्रमाण मोठे होते. यात्रा समितीने ध्वनीवर्धकाव्दारे गर्दीत वाट चुकलेल्या मुलांच्या वर्णनाची माहिती देण्याचे काम अहोरात्र केले. गर्दीचा फायदा घेऊन अनेक खिसेकापुंनी आपले इप्सित साध्य केले. आमदार चंद्रशेखर घुले यांनी बन्नो माँचे दर्शन घेऊन चादर अर्पण केली. आ. घुले यांच्या प्रयत्नामुळे देवस्थानचा 'क' वर्गात समावेश झाल्याने सभा मंडपाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. |
Sunday, 9 October 2011
हिंदु -मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या बन्नोमा यात्रेस प्रारंभ
बुधवारी संदल निघणार असून रात्री गोदावरीच्या पाण्याने बंनोमाच्या समाधीस जलस्नान घालून यात्रेस प्रारंभ होणार आहे . गुरुवारी छबिना निघणार असून यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे याच दिवशी राज्यातील नामांकित ५ ते ६ तमाशा फडाच्या जुगलबंदी चा कार्यक्रम हि पाहायला मिळणार आहे .
दरम्यान यात्रेच्या मुख्य दिवशी शुक्रवारी कुस्त्यांचा जंगी हंगामा होणार आहे .या हगाम्यात राज्यातील हिंदकेसरी महाराष्ट्रकेसरीसह नामांकित मल्ल हजेरी लावत असतात तसेच शनिवारी बन्नोमा चरणी विविध कलाकाराच्या हजेर्याचा कार्यक्रम होणार आहे .
या वर्षी पाऊस चांगला झाल्याने यात्रेला किमान ५ ते ६ लाख उपस्थित राहतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे .यात्रा काळात अवैध धंद्यांना पूर्णपने बंदी घालण्यात आली आहे .भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ४० ते ५० पोलिसांचा फौज फाटा तैनात करणार असल्याची माहिती शेवगावंचे पोलिसनिरीक्षक माने यांनी दिली .दरम्यान जिल्हा पोलीस अधिक्षक कृष्णप्रकाश भेट देणार असल्याचे समजते .
Saturday, 8 October 2011
बोधेगाव परिसरात उसावर लोकरीमाव्याचे आगमन
शेतकरी हैराण
बोधेगाव दि .९ [गणपत दसपुते ]शेतील बोधेगाव परिसरात उसावर लोकरीमाव्याचे आगमन झाले असून शेतकरी हैराण झाले आहेत .या बाबत वैद्यनाथ केदारेश्वर चे उस विकास अधिकारी व्ही .आर .शिंदे म्हणाले उसाच्या पानावरील मागील बाजूस पांढरी कीड जमा झाली असून शेतकऱ्यांनी उस प्लॉट चीपाहणी करावी .व कृषी विभागाचा सल्ला घ्यावा .Friday, 7 October 2011
Subscribe to:
Posts (Atom)