Friday, 30 December 2011
Thursday, 15 December 2011
Wednesday, 7 December 2011
Tuesday, 6 December 2011
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा आदर्श घ्यावा - मांदळे
बोधेगाव दि .६[वार्ताहर ] भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून बोधेगाव जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक महादेव मांदळे यांनी अभिवादन करत डॉ. बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा धडा विद्यार्थ्यांनी घेऊन आपली वाटचाल करण्याचा सल्ला दिला. महानिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी ‘बाल आंबेडकर’ विषयावर ग. वि. दसपुते यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते करीम बापू सय्यद हे होते. याप्रसंगी मुलांची भाषणे झाली. कार्यक्रमाला भागवत घुले, सुखदेव शिंदे, शैला कुबडे, चंद्रशेखर पाटील, अंबादास गर्कळ यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. [छाया -अन्वर मणियार ]

Monday, 5 December 2011
भूमिहिनांना आमआदमीचा आधार |
बोधेगाव। दि. ५ (गणपत दसपुते) |
आमआदमी विमा योजनेंतर्गत येथील १६ भूमिहीन व १८ अल्पभूधारक लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाचा समारंभ येथील मंडलाधिकारी कार्यालयात आज झाला. येथील भूमिहीन मजुरांनी सन २0१0-११ मध्ये या योजनेसाठी तलाठी कार्यालयामार्फत अर्ज केले होते. त्यानुसार १६ भूमिहीन व १८ अल्पभूधारक शेतकर्यांना विमाप्रमाणपत्र मिळाली आहेत. मंडल अधिकारी कार्यालय तलाठी अप्पासाहेब शिंदे, दत्तात्रय घोरतळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. दरम्यान, या विमा प्रमाणपत्राद्वारे भविष्यात या लाभार्थींचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास तीस हजार, अपंगत्व आल्यास ३७ हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. या लाभार्थींचा पाल्य जर ९ वी ते १२ मध्ये शिक्षण घेणारा असल्यास त्याला शंभर रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती मिळणार आहे[छाया -अन्वर मणियार ]. |
Sunday, 27 November 2011
बोधेगाव अवैध धंद्याच्या विळख्यात |
गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ |
बोधेगाव। दि. २७ [गणपत दसपुते] |
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसर सध्या अवैध धंद्याचा अड्डा बनला आहे. त्यामुळे गुन्हेगारीच्या प्रमाणातही वाढ होत आहे. अधोडी व बालमटाकळी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी टाकलेल्या छाप्यात टेम्पोभर देशी, विदेशी दारुचा अवैध साठा जप्त करण्यात आला. हा गोरख धंदा गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादाने चालू होता. बालमटाकळी येथे आढळलेल्या रिकाम्या बाटल्या, लेबल, झाकणे यावरुन बनावट दारु तयार करण्याचा व्यवसाय सुरु होता, असे प्रथमदर्शनी दिसते. या परिसरात पूर्वी पोत्यांनी गांजा सापडला होता. गेल्या महिन्यात जुगार अड्डय़ावर छापा टाकून मटकाकिंगला पकडण्यात आले होते. हे सर्व अवैध धंदे मराठवाड्याची सरहद्द बोधेगावपासून दहा कि. मी. अंतरावर असल्याने ते फोफावले आहेत. या भागातील माल मराठवाड्यात तर मराठवाड्यातील दारु, गांजा गावात विकण्याचे नेटवर्क वाढत आहेत. ुकमी पोलिस बळाचा फायदा हे तस्कर घेत असून त्यांचे मोबाईलचे नेटवर्क कारणीभूत आहे. या अवैध धंद्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ |
बोधेगाव येथील युवकांचे पोलिस दादांचे स्वप्न अखेर साकार [छाया -अन्वर मणियार ] | ||
बोधेगाव। दि.२७ (गणपत दसपुते) | ||
पोलिस भरतीची जाहिरात येण्यापूर्वी वर्षापासून खेळाच्या मैदानात भरतीची तयारी करणार्या बोधेगाव येथील आठ युवकांचे स्वप्न अखेर साकार झाले. दुष्काळी पट्टय़ात असलेल्या या भागात शेती, मजुरीशिवाय सुविधा नसल्याने या युवकांनी शारीरिक व अभ्यासाची तयारी केली. नगर येथे नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीत ते दाखल झाले आणि त्यांचे पोलिस बनण्याचे स्वप्न साकार झाले. बोधेगाव ग्रामस्थांनी बन्नो माँ दर्गा येथे भरतीमध्ये निवड झालेले संदीप गर्जे, विनोद मासाळकर, वैभव खिळे, याकूब सय्यद, अकबर पठाण, आप्पासाहेब वैद्य, ज्ञानदेव इलग, अमोल आंधळे यांचा जि. प. सदस्य प्रकाश भोसले, राम केसभट, ग्रा.पं. सदस्य कुंडलिक घोरतळे, वसंतराव दसपुते, आस्मान घोरतळे यांनी ग्रामस्थांच्यावतीने सत्कार केला. प्रामाणिक नोकरी करुन भ्रष्टाचाराला थारा देणार नाही, अशी ग्वाही या युवकांनी दिली. या सत्कारप्रसंगी पालकांच्या चेहर्यावर आनंदाश्रु दिसत होते. |
Saturday, 26 November 2011
अधोडी, बालमटाकळीत दारुसाठापकडला [छाया -अन्वर मणियार ]
बोधेगाव[गणपत दसपुते]- बोधेगाव परिसरातील अधोडी फाटा व बालमटाकळी येथील छाप्यात परराज्यातील दारुसाठा, बनावट दारु तयार करण्याचे साहित्य, टाटा सुमो असा सुमारे बारा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. नगर येथील उत्पादन शुल्क विभागाला खबर्यामार्फत मिळालेल्या माहितीवरुन बोधेगाव-पाथर्डी मार्गावरील अधोडी फाट्यावरील एका घरातून १९४ बॉक्स परराज्यातील दारु जप्त केली. हॉटेल चालक अंबादास पोटभरे यास अटक करण्यात आली. तसेच शेवगाव-गेवराई मार्गावरील बालमटाकळी येथील आसाराज छाजेड यांच्या गाळय़ात सहा बॉक्स दारु, तीन पोती दारुच्या बाटलीचे झाकण व लेबल आढळून आले. या पथकाने या गाळय़ाला सील केले आहे. अधोडी येथे पकडलेल्या दारु बॉक्सवर दमण येथील लेबल आहे. तसेच बालमटाकळी येथे बिअर, देशी दारुच्या बाटल्यांची रिकामी झाकणे आढळून आली. गांजा तस्करीत छाजेड याच्याविरुध्द गुन्हे दाखल आहेत. नगर येथील राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक प्रदीप वाळुंजकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Monday, 14 November 2011
बोधेगाव परिसरात ३५ गावांत बालग्रामसभा | ||
बोधेगाव। दि. १४ (गणपत दसपुते) | ||
बालदिनाचे औचित्य साधून बोधेगाव जि. प. शाळेत बालग्रामसभा घेण्यात आली. बोधेगाव परिसरातील ३५ गावांमध्ये या बालग्रामसभा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात आमच्या शाळेला संरक्षक भिंत द्या, शाळेसमोरील कचर्याची विल्हेवाट लावा, शाळेला अवांतर वाचनाची पुस्तके द्या, अशा समस्या मांडण्यात आल्या. तसेच त्या सोडविण्यासाठी विविध ठरावही करण्यात आले. बोधेगावचे सरपंच राम अंधारे, उपसरपंच भाऊराव भोंगळे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांमधून या सभेचा अध्यक्ष व सचिव सभासद निवड करून ही सभा घेण्यात आली. त्यामध्ये चौथीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. याप्रसंगी सरपंच अंधारे व उपसरपंच भोंगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सु. वि. शिंदे, भा. त्रि. घुले यांनी दिली. या बालग्रामसभेला ग. वि. दसपुते, क. म. पोटभरे, म. शि. मांदळे, सुर्यवंशी, पाटील, गर्कळ, बडे, कुबडे, शेलार केंद्रप्रमुख निर्मला जाधव उपस्थित होते. परिसरातील ३५ गावांत बालग्रामसभा झाल्या. बालकांचे हक्क, कर्तव्ये समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचाच भाग म्हणून बोधेगाव जि.प. शाळेत बालग्रामसभा घेण्यात आली. त्यात वेगवेगळे ठराव करण्यात आले. |
Saturday, 12 November 2011
Monday, 7 November 2011
भावात तडजोड करा मुंडेंचा शेतकरी संघटनेला सल्ला; दराच्या घोषणेला मात्र बगल!
(08-11-2011 : 01:44:48) Share
(08-11-2011 : 01:44:48) Share
बोधेगाव येथील केदारेश्वर कारखान्याच्या गळीत हंगामप्रसंगी शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना खासदार गोपीनाथ मुंडे. |
केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्यात धोरणामुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यामुळेच शेतकर्यांच्या उसाला योग्य भाव देता येत नाही, असा आरोप करीत खासदार गोपीनाथ मुंडे यांनी शेतकरी संघटनेला दराबाबत तडजोडीचा सल्ला दिला. मात्र, स्वत:च्या कारखान्याबाबत ऊसदर जाहीर करण्याचे खुबीने टाळले. त्यामुळे ऊसउत्पादकांचा भ्रमनिरास झाला.
वैद्यनाथ-केदारेश्वर साखर कारखान्याच्या दुसर्या गळिताचा प्रारंभ खासदार मुंडे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी केदारेश्वरचे अध्यक्ष अँड. प्रतापराव ढाकणे हे होते.
राज्यातील साखर कारखान्यांनी ेसाडेचौदाशेवर भाव दिल्यास कारवाईचा इशारा खुद्द अजित पवारांनी दिला आहे, असा आरोप मुंडे यांनी केला.
ते म्हणाले की, साखर उद्योगाबद्दल सरकारचे उदासीन धोरण जबाबदार आहे. या हंगामात मंत्री शरद पवार, विलासराव देशमुख, पतंगराव कदम यांनी त्यांच्या स्वत:च्या कारखान्यात मोळ्या टाकल्या. परंतु भाव जाहीर केला नाही. त्यामुळे मीही माझ्या ताब्यातील कारखान्याचा भाव जाहीर केला नाही, असे सांगून ऊसभावाबाबत मिठाची गुळणी धरली.
साखर कारखाना व शेतकरी संघटनांनी ऊस भावाबाबत तडजोड करावी. त्यासाठी मध्यस्थी करण्याची माझी तयारी आहे. चालू हिवाळी अधिवेशनात मी शेतकर्यांच्या बाजूने संसेदत उसाला जादा भाव देण्याबाबत आग्रही भूमिका घेणार आहे, असे मुंडे म्हणाले.
गेल्या वर्षी केदारेश्वर भागीदारीत घेताना राज्य सहकारी बँकेने उशिरा परवाना दिला. त्यामुळे सव्वादोन लाखांचे गाळप झाले. १ हजार ७५0 रुपये टनामागे ऊसउत्पादकांना भाव दिला. उर्वरित हप्ता डिसेंबरमध्ये देणार आहे. सभासद शेतकर्यांना १0 किलो साखर देणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी केदारेश्वरचे अध्यक्ष अँड. प्रतापराव ढाकणे यांचे भाषण झाले. कार्यक्रमाला आमदार राम शिंदे, बाळासाहेब आजबे, राजेंद्र बनसोडे, उपाध्यक्ष काटे, बाळासाहेब कांबळे, गोपाळ शर्मा उपस्थित होते.
बंद कारखाने सुरू करणारा मी डॉक्टर!
बंद कारखाने सुरू करणारा मी डॉक्टर आहे. राज्यातील वर्षानुवर्षे बंद पडलेल्या अनेक कारखान्यांना ऊजिर्तावस्थेत आणले आहे. एक बंद कारखाना सुरू झाल्यास दहा हजार कामगारांना रोजगार मिळतो. सहकार ही मक्तेदारी नाही. मी ‘वैद्यनाथ’ यशस्वीपणे चालवून राज्यात आदर्श निर्माण केला, असे मुंडे म्हणाले.
दादांना काकांचीच रिटायरमेंट हवीय
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवताना मुंडे म्हणाले की, ‘आधी काकांच्या वयाचा विचार करा. मला रिटायर होण्याचा सल्ला देऊ नका. तसेच दुसर्यांना शिव्या देण्याचे काम बंद करा; अन्यथा मलाही चांगल्या शिव्या येतात. अजित पवार हे अप्रत्यक्षपणे माझ्या माध्यमातून शरद पवार यांच्याच रिटायरमेंटची वाट पहात असल्याचा टोलाही त्यांनी मारला. [ छाया -अन्वर मणियार ]
Friday, 4 November 2011
Wednesday, 2 November 2011
चोरट्यांचा धुमाकूळ |
बोधेगाव। दि. २ (गणपत दसपुते) |
शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बोधेगावनजीकच्या लाडजळगाव येथे एकाच रात्री झालेल्या तीन घरफोड्यांमध्ये पन्नास हजाराचा तर ठाकूरपिंपळगाव येथे झालेल्या चोरींच्या दोन घटनांमध्ये दीड लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. लाडजळगाव येथील शिवाजी तहकीक यांच्या घरातून चोरट्यांनी रोख दोन हजार, हबीब शेख यांच्या घरातून पाच हजारांचा ऐवज तसेच रामभाऊ तहकिक यांच्याकडे सुमारे पन्नास हजाराचे सोने व चांदीचे दागिने चोरट्यांनी लांबविले. बोधेगावपासून पाच कि. मी. अंतरावरील शेवगाव-गेवराई राजमार्गावरील ठाकूरपिंपळगाव येथे नारायण धायतडक, केदारनाथ दहिफळे यांच्याकडे झालेल्या चोरींच्या दोन घटनांमध्ये दीड लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. बोधेगाव दूरक्षेत्रात पोलिस बळ कमी आहे. हे पोलिसांच्या पथ्यावर पडले आहे. सहाय्यक फौजदार वाघमोडे यांनी स्वेच्छानवृत्ती घेतल्याने ही जागा रिक्त आहे. मुख्यालयी पुरेसे पोलिस नसल्याने चोर्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. उपसरपंच भाऊराव भोंगळे यांनी पोलिस बळ वाढवून गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याची मागणी केली. |
Tuesday, 1 November 2011
आठ गावांच्या पाणी योजनेवरील गंडांतर टळले | ||
आमदार घुलेंची यशस्वी मध्यस्थी | ||
आमदार घुलेंची यशस्वी मध्यस्थी बोधेगाव। दि.१( गणपत दसपुते) गेल्या चार दिवसांपासून बंद असलेल्या बोधेगावसह आठ गावांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी आमदार चंद्रशेखर घुले यांनी यशस्वी मध्यस्थी केली. त्यांच्यामुळेच पाणीयोजनेवरील गंडांतर तूर्त टळले. बोधेगावसह आठ गावांच्या पाणी योजनेचा वीज पुरवठा थकबाकीचे कारण देत महावितरणने तोडला होता. याबाबत या पाणीवाटप संस्थेचे अध्यक्ष रामजी अंधारे यांनी तातडीने आठ गावांच्या सरपंचाची बैठक घेऊन शेवगाव-गेवराई मार्गावर रास्ता रोकोचा इशारा दिला होता. याबाबत या भागाचे आमदार चंद्रशेखर घुले यांनी जिल्हा अभियंत्यांना या योजनेची वस्तुस्थिती सांगितली. चालू बाकी भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्याचे निश्चित केले. त्याचबरोबर सध्या एक लाखाचा धनादेश देऊन योजनेचा वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे ठरले. त्यानुसार पाणीवाटप संस्थेचे अध्यक्ष अंधारे यांनी एक लाखाचा धनादेश आज महावितरणच्या शेवगाव कार्यालयाकडे सुपूर्त केला. त्यानुसार वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. गुरुवारपर्यंत आठही गावामध्ये टप्प्याटप्प्याने पाणी येणार आहे. पाण्यासाठी ठिय्या गेल्या चार दिवसांपासून पिण्याचे पाणी नसल्याने संतप्त महिलांनी बोधेगाव ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. अचानक आलेल्या या मोर्चामुळे ग्रामपंचायत प्रशासनाची धावपळ झाली. लवकरच पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिला शांत झाल्या. |
Monday, 31 October 2011
बोधेगाव पाणी योजनेसाठी उद्या आठ गावांचा रास्तारोको | ||
बोधेगाव। दि. ३१ (गणपत दसपुते) | ||
थकबाकीचे कारण देत महावितरण कंपनीने बोधेगावसह आठ गावांच्या पाणी पुरवठय़ाचा वीज पुरवठा खंडित केल्याने या पाणी वाटप संस्थेने महावितरणच्या विरोधात बुधवार (दि. २) रोजी शेवगाव-गेवराई राजमार्गावर रास्ता रोकोचा इशारा आज झालेल्या सरपंचांच्या बैठकीत दिला आहे. गेल्या शनिवारी (दि. २९) रोजी महावितरण कंपनीने थकबाकीचे कारण पुढे करत बोधेगावसह आठ गावांच्या पाणी योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्याने आज दि. ३१ रोजी या पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष रामजी अंधारे यांनी तातडीची आठ गावांच्या सरपंचाची बैठक घेतली. त्यामध्ये रास्ता रोकोचा निर्णय घेण्यात आला व वरिष्ठांना निवेदन पाठवले असून, त्यामध्ये या योजनेचा वीज पुरवठा सुरळीत करून १५ दिवसांची मुदत, चालू बाकी भरण्यासाठी द्यावी व या योजनेचे जिल्हा परिषदेकडील थकलेले ९ लाख अनुदान प्राप्त झाल्यावर उर्वरित थकबाकी भरण्याची सवलत मिळावी असे म्हटले आहे. दरम्यान, ही योजना सुरू झाल्याने बोधेगाव, बालमटाकळी, राणेगाव, शिंगोरी, दहिगाव-शे, अंतरवाली खुर्द, ठाकूर पिंपळगाव, चापडगाव या गावांचे टँकर बंद झाले. परंतु या योजनेला अडसर आल्यास शासनाने पुन्हा टँकर सुरू करण्याची मागणीही सरपंचाच्या बैठकीत करण्यात आली. सदर निवेदनाच्या प्रती जिल्हास्तरीय संबंधित अधिकार्यांना पाठविण्यात आल्या आहेत. या पाणी योजनेच्या तोडगा बैठकीला बोधेगावचे सरपंच तथा अध्यक्ष राम अंधारे, उपसरपंच भाऊराव भोंगळे, ठाकूर पिंपळगावचे सरपंच बापू बडे, बालमटाकळीचे सरपंच, तुषार वैद्य, अंतरवालीचे सरपंच एकनाथ कसाळ, शिंगोरीचे उपसरपंच प्रभाकर चेमटे, राणेगावचे सदस्य बाळासाहेब खेडकर, चापडगावचे सरपंच शिवाजी नेमाने उपस्थित होते .[ छाया -अन्वर मणियार ] |
Sunday, 30 October 2011
बोधेगावसह आठ गावांमध्ये निर्जळी
थकबाकीवरुन 'महावितरण' कडून पाणी योजनेची वीज पुन्हा खंडित, तोडग्यासाठी आज बैठक
'महावितरण' कडून
...
सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याचा बोधेगावचे सरपंच राम अंधारे यांचा आरोप बोधेगाव । दि. ३0 (गणपत दसपुते)
थकबाकीचे कारण देत 'महावितरण' ने पुन्हा शेवगाव तालुक्यातील बोधेगावसह आठ गावांचा वीजपुरवठा शनिवारी (दि. २९) खंडित केला. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ पुन्हा महिलांवर आली आहे.
गेल्या आठ दिवसापूर्वी ऐन दिवाळीच्या तोंडावर 'महावितरण' ने वीज पुरवठा खंडित करुन पाणी योजनेला वेठीस धरले होते. परंतु पाणी वाटप संस्थेने एक लाखाची बाकी भरली होती. त्यानंतर पाणी योजनेचा वीज पुरवठा पुर्ववत सुरु झाला.
दरम्यान, महिना, पंधरा दिवसानंतर 'महावितरण' या पाणी योजनेला मागील थकबाकीचे कारण पुढे करीत वीज पुरवठा खंडित करते, असा आरोप पाणीवाटप संस्थेचे अध्यक्ष राम अंधारे यांनी केला आहे. याबाबत आमदार चंद्रशेखर घुले यांनी 'महावितरण' ला सबुरीने घेण्याचा सल्लाही दिवाळीत दिला होता.
आठ गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या या योजनेचे बोधेगावचे सरपंच सदस्य आहेत. पाणी योजना ताब्यात घेतांना संबंधित ठेकेदाराने निकृष्ट प्रतीचे पाईप, फिटींगचे साहित्य वापरल्याने योजनेवर आतापर्यंत झालेला खर्च मोठा असल्याचे सरपंच अंधारे यांनी सांगितले.
कपाशीसह इतर पिकांचेही अतवृष्टीने नुकसान झाल्याने या भागातील शेतकर्यांकडे सध्या पाणीपट्टी व घरपट्टी भरण्यासाठी पैसा नाही. वसूलही होत नसल्याने ही योजना कशी चालवायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरपंच तथा पाणी योजनेचे अध्यक्ष राम अंधारे यांनी आठ गावातील सरपंचांची तातडीची बैठक सोमवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी बोलाविली आहे. बैठकीत 'महावितरण' च्या विरोधात करण्यात येणार्या आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे अंधारे यांनी सांगितले.
बोधेगाव, बालमटाकळी, शिंगोरी, राणेगाव, अंतरवाली, चापडगाव, ठाकूरपिंपळगाव, एकबुरजी या गावांना गदेवाडी फाट्यावरील जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होतो. दर महिन्याला या पाणी योजनेचे वीज बील पाणी वाटप संस्था भरते. परंतु मागील थकबाकीचे कारण देत 'महावितरण' ने या पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडित केला.
दिवाळीनंतर 'महावितरण' ने पुन्हा या पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडित केला आहे. दरम्यान, पाणी पुरवठा खंडित झाल्याने या गावांमधील महिला, शाळकरी मुलांना पाण्यासाठी भटकंती पुन्हा सुरु झाली आहे. 'महावितरण' कडून
सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याचा बोधेगावचे सरपंच राम अंधारे यांचा आरोपSee मोरेछाया -[अन्वर मणियार बोधेगाव]

सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याचा बोधेगावचे सरपंच राम अंधारे यांचा आरोपSee मोरे
Sunday, 23 October 2011
आठ गावांमध्ये निर्जळी | ||
बोधेगाव। दि. २२ (वार्ताहर) | ||
थकबाकीच्या कारणावरुन 'महावितरण' ने वीज पुरवठा खंडित केल्याने शेवगाव तालुक्यातील बोधेगावसह आठ गावांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. बोधेगाव, बालमटाकळी, शिंगोरी, राणेगाव, अंतरवाली, चापडगाव, ठाकूरपिंपळगाव, एकबुरजी या गावांना गदेवाडी फाट्यावरील जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होतो. दर महिन्याला या पाणी योजनेचे वीज बील पाणी वाटप संस्था भरते. परंतु मागील थकबाकीचे कारण देत 'महावितरण' ने या पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडित केला. 'महावितरण' सापत्नभावाची वागणूक देत असल्याचा आरोप पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष, बोधेगावचे सरपंच राम अंधारे यांनी केला. दरम्यान, पाच दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित झाल्याने या गावांमधील महिला, शाळकरी मुलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ऐन दिवाळीत ' महावितरण' ने थकबाकीचे कारण देत वीज पुरवठा खंडित करुन ग्रामस्थांच्या उत्साहावर पाणी पेरले आहे. दिवाळीसाठी पाहुणे म्हणून आलेल्यांनावरही हंडा घेऊन आड, विहीर शोधण्याची वेळ आली आहे. |
Friday, 14 October 2011
बन्नो माँ यात्रेत रंगली रंगबाजी | ||
बोधेगाव। दि. १४ (गणपत दसपुते ) [ छाया -अन्वर मणियार ] | ||
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील बन्नो माँ यात्रेत भाविकांच्या गर्दीचा उच्चांक झाला. दुसर्या दिवशी तीन तमाशा फडाची रंगबाजी तसेच वगनाट्याच्या जुगलबंदीने यात्रेत रंगत आली. चार दिवस चालणार्या यात्रौत्सवाच्या आज तिसर्या दिवशी बन्नो माँ दग्र्यात गर्दीचा महापूर लोटला होता. त्यामुळे शेवगाव-गेवराई राजमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यात्रेत नवसाची चादर वाहण्याची परंपरा असल्याने गावकरी पाहुण्यांसह बन्नो माँ चरणी चादर अर्पण करण्यासाठी सक्रिय झाले होते. यात्रेत लहान मुले हरवण्याचे प्रमाण मोठे होते. यात्रा समितीने ध्वनीवर्धकाव्दारे गर्दीत वाट चुकलेल्या मुलांच्या वर्णनाची माहिती देण्याचे काम अहोरात्र केले. गर्दीचा फायदा घेऊन अनेक खिसेकापुंनी आपले इप्सित साध्य केले. आमदार चंद्रशेखर घुले यांनी बन्नो माँचे दर्शन घेऊन चादर अर्पण केली. आ. घुले यांच्या प्रयत्नामुळे देवस्थानचा 'क' वर्गात समावेश झाल्याने सभा मंडपाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. |
Sunday, 9 October 2011
हिंदु -मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या बन्नोमा यात्रेस प्रारंभ
बुधवारी संदल निघणार असून रात्री गोदावरीच्या पाण्याने बंनोमाच्या समाधीस जलस्नान घालून यात्रेस प्रारंभ होणार आहे . गुरुवारी छबिना निघणार असून यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे याच दिवशी राज्यातील नामांकित ५ ते ६ तमाशा फडाच्या जुगलबंदी चा कार्यक्रम हि पाहायला मिळणार आहे .
दरम्यान यात्रेच्या मुख्य दिवशी शुक्रवारी कुस्त्यांचा जंगी हंगामा होणार आहे .या हगाम्यात राज्यातील हिंदकेसरी महाराष्ट्रकेसरीसह नामांकित मल्ल हजेरी लावत असतात तसेच शनिवारी बन्नोमा चरणी विविध कलाकाराच्या हजेर्याचा कार्यक्रम होणार आहे .
या वर्षी पाऊस चांगला झाल्याने यात्रेला किमान ५ ते ६ लाख उपस्थित राहतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे .यात्रा काळात अवैध धंद्यांना पूर्णपने बंदी घालण्यात आली आहे .भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ४० ते ५० पोलिसांचा फौज फाटा तैनात करणार असल्याची माहिती शेवगावंचे पोलिसनिरीक्षक माने यांनी दिली .दरम्यान जिल्हा पोलीस अधिक्षक कृष्णप्रकाश भेट देणार असल्याचे समजते .
Saturday, 8 October 2011
बोधेगाव परिसरात उसावर लोकरीमाव्याचे आगमन
शेतकरी हैराण
बोधेगाव दि .९ [गणपत दसपुते ]शेतील बोधेगाव परिसरात उसावर लोकरीमाव्याचे आगमन झाले असून शेतकरी हैराण झाले आहेत .या बाबत वैद्यनाथ केदारेश्वर चे उस विकास अधिकारी व्ही .आर .शिंदे म्हणाले उसाच्या पानावरील मागील बाजूस पांढरी कीड जमा झाली असून शेतकऱ्यांनी उस प्लॉट चीपाहणी करावी .व कृषी विभागाचा सल्ला घ्यावा .Friday, 7 October 2011
Thursday, 16 June 2011
Wednesday, 15 June 2011
चंद्र ग्रहणामुळे वडाची १२ वाजल्याच्या आत पूजा करण्यासाठी सुहासिनीची गर्दी
चंद्र ग्रहणामुळे वडाची १२ वाजल्याच्या आत पूजा करण्यासाठी सुवासिनीची गर्दी
(छाया-अन्वर मणियार बोधेगाव )
बोधेगाव - सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून व चंद्रग्रहणाच्या कारणामुळे दुपारी १२ च्या आत असणार्या मुहार्तामुळे बोधेगावतील येथील सुवासिनींनी मारुती मंदिराजवलील असणार्या वडाला पुजन्यासाठी सकाळपासूनच मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती.
Tuesday, 14 June 2011
उपचारा अभावी हरणाच मृत्यू
उपचारा अभावी हरणाच मृत्यू ..........
वनाधीकार्याच्या दुर्लक्स्यामुळे बेवारस पडलेले हरण .....
( छाया -अन्वर मणियार बोधेगाव )
शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव सह परिसरातील मालराणमुळे व निर्माण झालेल्या
परिस्थितीमुळे याठिकाणी जवळपास २५ ते ३० हरीणांचे कळपाचे वावर असून चारा व पाण्याच्या शोधात वावरत असताना एक हरीण डॉक्टर सतीश चव्हान यांच्या शेतात तडफडत असताना प्रथम दर्शनी दिसले .परंतु त्याला लवकर उपचार न मिळाल्या मुले जागेवरच मरण पावले .
Subscribe to:
Posts (Atom)